Groundnut Cultivation: 55 गुंठ्यात भुईमुगाची लागवड आणि उत्पादन घेतले 45 पोती, ‘अशा पद्धती’च्या नियोजनाने झाले शक्य


Groundnut Cultivation:-कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन घेता येते हे बऱ्याचदा आपण अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून पाहत असतो. परंतु अशा भरघोस उत्पादन घेण्यामागे त्यांनी केलेले व्यवस्थापन, व्यवस्थापन करताना त्याचा अचूक कालावधी इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. सध्याच्या हवामान बदलामुळे पिकांपासून भरपूर उत्पादन घेणे खूप आवाहनात्मक आहे. भुईमूग लागवड कशी करावी ( bhuimug lagwad kashi karavi ) याचे बरेच टेन्शन असते.Bhuimug lagwad information in marathi.


परंतु तरी देखील काही शेतकरी  अचूक व्यवस्थापनाने आणि कष्टाने खूप चांगले उत्पादन घेत आहेत. अगदी त्याच पद्धतीने जर आपण पाटण तालुक्यातील मानेगाव येथील अधिकराव माने या प्रगतिशील शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर  योग्य नियोजनाच्या बळावर त्यांनी 55 गुंठ्यामध्ये चक्क 45 पोती भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घेतले आहे.


हे नियोजन आले कामी


याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाटण तालुक्यातील मानेगाव या गावचे अधिकराव माने हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांनी योग्य नियोजन आणि विविध प्रकारच्या उपाययोजनांच्या माध्यमातून 55 गुंठ्यामध्ये 45 पोती भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळ्यामध्ये या पिकासाठी खूप बिकट परिस्थिती असताना देखील त्यांनी ही किमया साधली आहे.


यामागे त्यांचे नियोजन खूप महत्त्वाचे असून त्यांना हे यश मिळाले आहे. यांच्या शेतामध्ये असलेला उसाचा खोडवा काढून टाकल्यानंतर त्यांनी 55 गुंठे शेतात रोटर मारून शेत  तयार केले व तयार करताना यामध्ये 12 ट्रॉली शेणखत तसेच चार ट्रॉली पोल्ट्री खताचा वापर केला व हे खत मातीमध्ये पसरवून चांगले मिक्स करून घेतले.


PM KISAN EKYC LIST


त्यानंतर भुईमूग लागवड करण्यासाठी त्यांनी कस्तुरी 108 या वाणाची निवड केली व पेरणी करून आवश्यकता खतांच्या मात्रा दिल्या. परंतु हे व्यवस्थापन करत असताना त्यांनी फवारणी आणि मशागत अगदी वेळच्यावेळी केली. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ताक, गुळ आणि अंड्यांपासून त्यांनी जो काही फॉर्मुला तयार केला त्याचा देखील खूप मोठा चांगला परिणाम होऊन फायदा झाला.


साधारणपणे पेरणी केल्यानंतर 130 दिवसांनी भुईमुगाचे उत्पादन हातात आले व चक्क त्यांना 45 पोते शेंगांचे उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे यावर्षी भुईमूग पिकासाठी प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी योग्य व्यवस्थापन आणि नियोजनाच्या माध्यमातून  ही किमया साधली. यावरून दिसून येते की योग्य कालावधीत केलेले योग्य व्यवस्थापन नक्कीच भरघोस उत्पादन देऊ शकते.


Kusum solar scheme

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने