माझी लाडकी बहीण योजना online apply |ladki bahini yojana online apply

माझी लाडकी बहीण योजना online apply 2024 करू शकता किंवा अजून काही पर्याय वापरून माझी लाडकी बहीण योजना माहिती व फॉर्म कसे व कुठे भरू शकता याची माहिती घेणार आहोत. Mazi ladki bahin yojana online apply information in marathi.


माझी लाडकी बहीण योजना online apply | ladki bahini yojana online apply
माझी लाडकी बहीण योजना 2024


अ) माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार

१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
३) कमीत कमी २१ वर्ष ते जास्तीत जास्त ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार.
४) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.


ब) माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला अपात्र

१) ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
३) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे १५०० रुपये जास्त लाभ घेतला असेल.
४) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे.
५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत.
७)ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
८) ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.

PM KISAN SOLAR YOJANA


क) माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा

१) योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.
२) पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील.
३) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
४) भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.


ड) माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती

१) माझी लाडकी बहीण योजना online apply करू शकता.
२) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला.
३) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
४) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
५) पासपोर्ट आकाराचा फोटो
६) शिधा पत्रिका (रेशन कार्ड)
७) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
८) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

 


अर्ज भरण्याची प्रक्रिया – Ladki Bahini Yojana Schedule 

– अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै

– अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै

– प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै

– प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै

– लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट

– लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने